बोटचा स्वस्तातील नवा वायरलेस इयरफोन भारतात लाँच, ४० तास बॅटरी बॅकअप मिळणार फक्त, 1499/- रुपये मध्ये.

बोटचा स्वस्तातील नवा वायरलेस इयरफोन भारतात लाँच, ४० तास बॅटरी बॅकअप मिळणार.
सध्या मार्केटमध्ये बोटची चलती आहे. बोटने मार्केटमध्ये प्रोडक्ट लाँचिंग केल्यापासून नावाजलेल्या जेबीएलच्या प्रोडक्ट्सवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. बोट स्वस्त किंमतीत जबरदस्त फीचर्सचे प्रोडक्ट युजर्संना देत आहे. जाणून घ्या नवीन वायरलेस इयरफोनसंबंधी.

हायलाइट्स:

🤴 Boat Rockerz 255 Pro+ वायरलेस इयरफोन भारतात लाँच
🤴 Boat Rockerz 255 Pro+ ची किंमत १ हजार ४९९ रुपये
🤴 नवीन वायरलेस इयरबड्ची बॅटरी बॅकअप जबरदस्त
भारतात Boat Rockerz 255 Pro+ वायरलेस इयरफोन आज लाँच करण्यात आला आहे. नवीन इयरफोनला कंपनीने दावा केला आहे की, आतापर्यंतचा बोटचा सर्वात बेस्ट नेकबँड स्टाइल वायरलेस इयरफोन आहे. Boat Rockerz 255 Pro+ ला वॉटरप्रूफ साठी IPX7 ची रेटिंग मिळाली आहे. याशिवाय क्वॉलकॉम aptX ब्लूटूथ कोडेक आहे. नवीन वायरलेस इयरफोनची किंमत कंपनीने १ हजार ४९९ रुपये ठेवली आहे.

Boat Rockerz 255 Pro+ ला तीन कलर वेरियंट मध्ये आणले आहे. अॅक्टिव ब्लॅक, नेवी ब्लू आणि टील ग्रीनचा समावेश आहे. याला ग्राहक ऑनलाइन खरेदी करू शकतात. तसेच Rockerz 255 Pro+ ला Amazon, Flipkart सह प्रमुख ई-कॉमर्स पोर्टल्स वर उपलब्ध करण्यात आले आहे.

Comments